Pune : शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द

एमपीसी  न्यूज :राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा (Pune)सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे . राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती एक वृतवाहिनीला दिली आहे .

इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे हा  नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आल्याच सांगण्यात येत आहे .

Nigdi : संक्रमणात समर्पण महत्त्वाचे – डॉ. सदानंद मोरे

पंढरपूर येथे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या (Pune)उपस्थितीत महाविकस आघाडीची बैठक होणार होती. पण शरद पवार यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक होणार नाही .

अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढा दौऱ्यावर आहेत.

शरद पवारांच्या या दौऱ्याची आयोजकांनी तयारी केली होती. या दौऱ्याची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. पण अचानक हा दौरा रद्द करण्यात आला.यामुळे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. शरद पवार सध्या बारामती येथे असून ते आज पुण्यात जणार  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.