Nigdi : गुळुंजकर, माळी, ढाके, नाईक वीणा सिस्टम मॅरेथॉनमध्ये प्रथम

एमपीसी न्यूज – वीणा क्लबच्या वतीने निगडी येथे वीना सिस्टम मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पृथ्वीराज गुळुंजकर, अमित माळी, ऋषिकेश ढाके, पार्थ नाईक यांनी प्रथम क्रमांक पारितोषिके मिळाली.

निगडीतील संत कबीर गार्डन याठिकाणी ही मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनचे उदघाटन निगडीचे हेड कॉन्स्टेबल किरण बुलबुले आणि एमपीसी न्यूजच्या पत्रकार लीना माने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बोर्लीकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी महासंघाचे कार्यालयप्रमुख अतुल आचार्य, वीणा क्लबच्या प्रमुख मारुती दांगट, वैशाली दांगट या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फ्लॅगऑफ दाखवून करण्यात आले. या स्पर्धेत 2 किलो मीटर ही फक्त चालण्याची स्पर्धा होती. तसेच एक किलो मीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा स्तरावर ही मॅरेथॉन घेण्यात आली.

  • या मॅरेथॉनचे निकाल पुढीलप्रमाणे -5 किलोमीटक धावणे -प्रथम – पृथ्वीराज गुळुंजकर, द्वितीय -श्रीकृष्ण गायकवाड, तृतीय -संदीप कुमार. तीन किलोमीटर – प्रथम -अमित माळी, द्वितीय -संकेत कांबळे, तृतीय आकाश माळी. 2 किलोमीटर धावणे -प्रथम – ऋषिकेश ढाके, द्वितीय – विजय ढवळे, तृतीय -रमेश चाफेकर. 2 किलोमीटर चालणे- प्रथम -संदीप सोनवणे, द्वितीय – बाबुराव पानसरे, तृतीय -मीना भारे. 1 किलोमीटर चालणे – (दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी) प्रथम -पार्थ नाईक, द्वितीय -ओमकार माळी, तृतीय -प्रणव नाईक. 1 किलोमीटर धावणे (60 वर्षाच्या वरील वृध्दासाठी) प्रथम -आनंदा पवार, द्वितीय -नवनाथ सोनवणे, तृतीय -अलका गुजर यांनी पारितोषिके पटकाविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.