Nigdi : गंगाराम कुरकुटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी दत्तवाडी येथील रहिवासी गंगाराम तुकाराम कुरकुटे (वय 55) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा सोपान, विवाहित मुलगी मुक्ता गुळांकर असा परिवार आहे. ते मुळचे कुरकूटवाडी (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवाशी आहेत.

गंगाराम कुरकुटे धार्मिक कार्यात अग्रेसर असत. निगडी परिसरातील सर्व धार्मिक सप्ताह, भजनी मंडळे यात त्यांचा सहभाग असे. ते भजनातील जाणकार व उत्तम गायक होते. बजाज ऑटो कंपनीचे ते निवृत्त कर्मचारी होते. नामवंत पखवाज वादक सोपान ऊर्फ तुळशीराम यांचे ते वडील, तर उद्योजक विनोद शिरोळे, दावल शिरोळे यांचे मेव्हणे होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.