Nigdi : ना. धों. महानोर यांना साहित्य अभिवाचनातून अभिवादन

एमपीसी न्यूज – रानकवी ना. धों. महानोर यांना त्यांच्याच ‘अजिंठा’ या अभिजात (Nigdi) साहित्यकृतीचे अभिवाचन करून रुद्रंग, निगडी – पुणे या संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पैस रंगमच, प्रीमियर प्लाझा, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे रविवार, (दि.17) संपन्न झालेल्या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन रमेश वाकनीस यांचे होते; तर अजिज सय्यद यांनी या संहितेला संगीतबद्ध केले होते. किशोरी सरीन यांनी अतिशय सुरेल आवाजात यामधील गीतांचे सादरीकरण केले.
अशोक अडावदकर, अभय बिलुरकर, अरुणा वाकनीस, अजिज सय्यद आणि रमेश वाकनीस (Nigdi) यांचा वाचकस्वर अभिवाचनासाठी लाभला. ब्रिटिश मेजर रॉबर्ट गिल आणि बंजारा समाजातील पारू यांच्या अजिंठ्यातील भव्य शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या शोकात्म प्रेमकथेचा काव्यात्म शैलीतील आविष्कार उत्तरोत्तर इतक्या उत्कट पातळीवर पोहोचला की, नकळत रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

ना. धों. काव्याभिवाचन या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पिंपरी – चिंचवड परिसरातील पीतांबर लोहार, माधुरी विधाटे, प्रदीप गांधलीकर, अर्चना भांडारकर, अभय बिलुरकर, मोनिका बागडे या कवींनी प्रत्येकी महानोर यांची एक आणि स्वतःची एक अशा कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. रंगकर्मी प्रभाकर पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभली होती. त्यांनी महानोर यांचा काळी माती अन् रानाशी असलेला अनुबंध उलगडून सांगताना ‘या नभाने या भुईला दान द्यावे…” या कवितेचे अभिवाचन केले.
शशिधर बडवे, प्रियांका आचार्य, अनिरुद्ध गोसावी, माधुरी ओक, नंदकुमार कांबळे, नंदकुमार मुरडे यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे आणि उज्ज्वला केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सागर यादव यांनी (Nigdi) आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.