Pimpri Chinchwad RTO : आरटीओ कडून वाहन चालक दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन (Pimpri Chinchwad RTO ) (आरटीओ) वतीने रविवारी (दि. 17) वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. वाहन चालकांच्या गौरवार्थ 17 सप्टेंबर हा दिवस वाहन चालक दिन म्हणून साजरा केला जातो.

बस चालक, ट्रक चालक, माल वाहतूक चालक, रुग्णवाहिका चालक, फायर फायटर चालक, कचरा संकलन वाहनांचे चालक, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, पीएमपी चालक अशा सर्व ठिकाणच्या वाहन चालकांचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सत्कार करण्यात आला. वाहन चालकांची समाजातील भूमिका कशी महत्वाची आहे, याबद्दल सांगत वाहन चालक करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Nigdi : ना. धों. महानोर यांना साहित्य अभिवाचनातून अभिवादन

पिंपरी-चिंचवड आरटीओच्या वतीने महिंद्रा लॉजिस्टिक्स, चाकण येथे देखील हा दिवस साजरा करण्यात आला. कंपनीतील 250 वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला. चालक दिनानिमित्त उपस्थित 88 वाहन चालकांची प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या वतीने लोकमान्य हॉस्पिटल यांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी महिंद्रा लॉजिस्टिक्स व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत राम, नरेश गोयत (जीएम ऑपरेशन), निंबा भामरे (जीएम ऑपरेशन), विजय भापकर (डेप्युटी जीएम) आणि लोकमान्य हॉस्पिटलचे पथक उपस्थित (Pimpri Chinchwad RTO ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.