Nigdi : बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरतेची गरज

'बदलते तंत्रज्ञान, माध्यमे आणि समाज' या विषयावर परिसंवाद संपन्न

एमपीसी न्यूज – प्रसारमाध्यमांच्या प्रदीर्घ प्रवासात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची व्याप्ती ( Nigdi) प्रचंड वेगाने वाढत आहे अशावेळी प्रत्येक माध्यमांनी आपली विश्वासार्हता जपून समाजप्रबोधनास प्राधान्य द्यावे. कुठल्याही माध्यमाचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर झाल्यास प्रत्येक माध्यम समाजजागृतीसाठी उपयोगी ठरेल, असे मत विश्व संवाद केंद्र, पुणे व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माध्यम संवाद परिषदे’त प्रमुख सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
‘बदलते तंत्रज्ञान, माध्यमे आणि समाज’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय तांबट, चित्रपट निर्माते व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक प्रद्योत पेंढारकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे निवेदक विराज सवाई यांनी विचार मांडले.
प्रमुख वक्ते डॉ. संजय तांबट यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुरुप माध्यमांची वाढलेली व्याप्ती, छपाई यंत्रापासून ( Nigdi) तर वेब पोर्टल, रिल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतचा प्रवास याबरोबरच भाषाशुद्धी, माध्यम साक्षरता यावर विशेष प्रकाश टाकला.
चित्रपट क्षेत्रातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान याविषयी प्रद्योत पेंढारकर यांनी तर आकाशवाणी या सर्वात जुन्या व आता आलेल्या नव्या स्वरूपातील रेडिओ विषयी विराज सवाई यांनी विवेचन करून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये सुरू झालेल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ बद्दल माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांनी आपले अनुभव, माहिती तसेच विविध उदाहरणांवरून माध्यमांतील स्थित्यंतरे, समाजमाध्यमांचा प्रभाव, माध्यमांतील आव्हाने याविषयावर मंथन करून सत्य व राष्ट्रीय विचारांना पूरक समाज प्रबोधनात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक पुणे विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे यांनी तर सारंग पापळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. देवाशिष सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पीसीईटी ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अजिंक्य काळभोर यांनी ( Nigdi)  सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.