Today’s Horoscope 19 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – गुरूवार.

19.10.2023.

शुभाशुभ विचार- ज्येष्ठा वर्ज्य.

आज विशेष- ललिता पंचमी.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र -ज्येष्ठा 21.04 पर्यंत नंतर मूळ.

चंद्र राशी – वृश्चिक 21.04 पर्यंत नंतर धनु.

————————————

मेष  ( शुभ रंग- भगवा )

आज तुम्ही काही तब्येतीच्या तक्रारींनी त्रस्त असाल. काही मोफत सल्लागार मंडळी आज खूपच बोअर करतील. आज आपल्या स्वार्थाकडे लक्ष असूद्या. परमार्थ नकोच.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. वेळेचे योग्य नियोजन केल्याने ध्येयप्राप्तीकडे वेगाने वाटचाल कराल. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे राहील. सामान्य दिवस.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )

नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. वरिष्ठांचे समाधान आज तरी शक्य नाही. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

कर्क (शुभ रंग- डाळिंबी)

मुलांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक राहील. आज सहकुटुंब चैन करण्यासाठी वेळ काढाल. घरात आर्थिक सुबत्ता राहील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

सिंह (शुभ रंग- लाल)

बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष द्यावे लागेल. मुलांची संगत ही तपासून पाहणे गरजेचे आहे. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी )

दैनंदिन कामात काही अडथळे येतील तुमचा बराचसा वेळ रिकाम टेकड्या गप्पांमध्येच फुकट जाईल नकारात्मक मंडळींपासून आज दूरच रहा. गृहिणींनी झाकली मूठ झकलीच ठेवावी.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)

आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचाही चांगलाच प्रभाव पडेल. भावंडांमध्ये मात्र काही कारणाने मतभेद संभवतात. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे राहील.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)

आज घराबाहेर रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायातील स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत. महत्त्वाचे निर्णय शांत डोक्याने निर्णय घ्यावेत.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. आपले काम सोडून उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. प्रवासात सावध राहावे.

मकर ( शुभ रंग- आकाशी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. काही कारणाने दुरावलेली मित्रमंडळी जवळ येतील. आज अनपेक्षित लाभाचा दिवस.

कुंभ (शुभ रंग – जांभळा )

आज नोकरदार वरिष्ठांच्या मर्जीत राहतील. उच्चशिक्षित तरुणांना चांगला पॅकेजच्या उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात वेळीच घेतलेले तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावर ढकलावेत. ज्येष्ठ मंडळींनी आज सत्संगात रमणेच हिताचे राहील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.