Nigdi : खरेदी केलेले सोने अवघ्या काही तासात चोरीला

एमपीसी न्यूज – खरेदी केलेले सोने चोरट्यांनी (Nigdi) अवघ्या काही तासात चोरून नेले. हा प्रकार बुधवारी (दि.12) निगडी प्राधिकरण येथील जिवेश्वर बस स्टॉपजवळ रात्री अकरा वाजता घडला आहे.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून दोन इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sinhagad Tiger Update : सिंहगड जवळील ससाणे नगर येथे वाघाचा वासरावर हल्ला; ग्रामस्थाचे म्हणणे ‘तो’ वाघच!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सोने खरेदी करून येत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येवून चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील पर्स हिसकावून नेली. या पर्समध्ये 52 हजार रुपयांचे 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याची वेढणी व 10 हजार रुपयांचा मोबाईल व रोख रक्कम हजार रुपये असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याचा (Nigdi) पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.