Kuruli Accident : अपघाती पादाचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ट्रकच्या धडकेत (Kuruli Accident) एक तरूण गंभीर जखमी झाला होता. हा अपघात बुधवारी (दि.12) कुरुळी येथे घडला होता. उपचारा दरम्यान लाखनसिंग रमेशसिंग चौरासीया (वय 28 रा.कुरुळी) याचा मृत्यू झाला आहे.

त्यानुसार ट्रक चालक मुरलीधर लक्ष्मण पिसाळ (वय 51 रा. कुरुळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकाससिंग रमेश सिंग चौरसिया (वय 24 रा.कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : खरेदी केलेले सोने अवघ्या काही तासात चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा (Kuruli Accident) भाऊ बुधवारी कुरळी फाट्याकडून पायी चालत येत होता. यावेळी आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक वेगाने व हयगयीने चालवून मयत लखनसिंग याला जोरात धडक दिली. यात लखनसिंग याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यावरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.