TDO : राज्य शासनातर्फे टीओडीला मंजुरी

एमपीसी न्यूज – राज्य शासनातर्फे टिओडीला (TOD) मान्यता दिली याबद्दल पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी अभिनंदन केले आहे.

सरकार नेहमी मोठ्या लोकांच्या सहकार्याने व मदतीने चालते हे आम्हाला मान्य आहे, पण हे सरकार येण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या मतदानाची गरज असते हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
नऊ मीटर खालील रस्त्यावर कुठल्याही प्रकारच्या सुख-सुविधा द्यायच्या नाहीत, हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असू शकतो आणि हा अचानकपणाने घेतलेला निर्णय आहे.

Kuruli Accident : अपघाती पादाचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

यापूर्वीच्या कालावधीमध्ये सहा मीटर वर टीडीआर वापरण्यास परवानगी होती. परंतु, एकदमच नगर नियोजनाच्या संकल्पनात्मक छोट्या रस्त्यावर मोठ्या इमारती नको अशा विचारात सहा मीटरच्या रस्त्यावरचा टीडीआर वापरण्यास परवानगी नाकारण्यात आली.

टिओडी धोरणामध्ये देखील हीच बाब पुढे चालू ठेवली आहे. ज्या ठिकाणी सहा मीटरचा रस्ता आहे, त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे अंतर रस्ता रूंदीत वजा करून ते अंतर फ्रंट मार्जिनमध्ये मोजले, तर हा प्रश्न संपून जाईल. कारण दीड मीटर रस्ता रुंदी आणि त्याच्यापुढे पाच मीटर फ्रंट मार्जिन यामुळे सात हजार चौरस फुटापर्यंतचे मध्यमवर्गीय लोकांचे प्लॉट हे नॉनबिल्डेबल होतात. याची आपण नगर रचना विभागाकडून खात्री करून घ्यावी. आम्ही देखील याबाबतीत आपणास युडीसीपीआर मधील तरतुदीनुसार सादरीकरण करू शकतो.

शिंदे साहेब आपल्या रूपाने एक सर्वसामान्य (TOD) लोकांचा विचार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला.  ठाण्यामध्ये आपण ठाण्याच्या नागरिकांना अनेक सुख-सुविधा दिल्या. आमची मागणी ही आहे, की सहा मीटरच्या रस्त्यावर देखील टीडीआर वापरण्यास परवानगी द्यावी. दोन्ही बाजूने दिड-दिड मीटरचे अंतर रस्त्यारूंदित घ्यावे व फ्रंट मार्जिनमधून ते दिड मीटर वजा करण्याचा निर्णय एमआरटीपी ऍक्ट कलम 154 अन्वये तात्काळ निर्गमित करावा, ही या महाराष्ट्रातील विशेषत: पुण्यातील मध्यमवर्गीय लोकांकडून  आपणास नम्र विनंती असल्याचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.