Nigdi : आरडी बर्मन व किशोरदांच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब पुना निगडी (Nigdi) तर्फे सुरेल गायनाचा फंड रेझींग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली व स्वर्गीय किशोरकुमारदा यांनी गायलेली बहारदार गाण्यांची मेजवानीच रसिकांना देण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्षम प्रांतपाल मा.एम जे फ लायन राजेश कोठावदे यांनी केले. या कार्यक्रमात माजी प्रांतपाल मा.लायन बी एल जोशी, आरसीएल डॉ दिलीपसिंह मोहिते, आर सी एल एन अनिल झोपे, कॅबिनेट अधिकारी एल एन मुरलीधर साठे, एल एन शैलजा सांगळे, एल एन वसत गुजर, एल एन सुदाम मोरे, एल एन चंद्रशेखर पवार, एल एन शेलार, एल एन राजेंद्र पगार, एल एन अजित देशपांडे, डॉ अनु गायकवाड व निगडी क्लबचे विविध स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र भुरुख व प्रशांत साळवी प्रस्तुत आलाप आर्केस्ट्राच्या (Nigdi) माध्यमातून लायन्स सभासदांनी व इतर श्रोत्यांनी आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने माजी महापौर आर एस कुमार, सूर्यकांत मुथियान, प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद, उद्योजक अतुल इनामदार, समाज सेवक राजेन्द्र बाबर, वारी टुअर्सचे अध्यक्ष लायन मारूती मुसमाडे, उद्योजक प्रदीप ढोकरे, बांधकाम व्यावसायिक शिरीश हिवाळे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी,  यमुनानगर जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, परमार व स्वप्नपुर्ति हौसिग सोसायटीचे सभासद प्राधिकरण बचतगटाच्या प्रमुख नसीम शिकलगार, मनिशा पोळ, निलीमा कोल्हे व त्यांच्या महिला सदस्या, चैतन्य हास्ययोगचे सदस्य, सुसंगती जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सदस्य, एकता जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन निगडी क्लबचे अध्यक्ष लायन देविदास ढमे व कार्यक्रम प्रमुख लायन सलीम शिकलगार यांनी केले माजी उपमहापौर शैलजा मोरे, संजय निंबाळकर, लायन अशोक येवले, लायन जनार्दन गावडे यांनी विषेश सहकार्य केले.  सूत्रसंचालन लायन राजीव कुटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.