Nigdi : निगडी येथे 26 नोव्हेंबर रोजी भरणार संत साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे येत्या 26 तारखेला संत साहित्य संमेलन(Nigdi) भरणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच वाचकांना संत साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे.हे संमेलन 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत गणेश तलावाजवळ भरणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्य शिरोमणी गुरुदेव शंकर अभ्यंकर असणार (Nigdi)आहेत. तर स्वागताध्यक्ष आमदार महेश लांडगे, प्रमुख अतिथी आमदार आण्णा बनसोडे, उद्घाटक अमित गावडे हे असणार आहेत. तसेच या संमेलनाला वक्ते म्हणून संत तुकाराम महाराजाचे 11 वे वंशज हभप शिरीष मोरे, समर्थ भक्त समीर लिमीये,राम कथाकार रवी पाठक,निरुपनकार अनघा मोडक, परमपुज्या माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती हे त्यांचे विचार मांडणार आहेत.

 

Maratha Reservation : 70 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण होते, हे सिद्ध झाले; विरोधकांच्या टीकेला दुर्लक्ष करा – मनोज जरांगे

या संमेलनात संत साहित्याची पालखी देखील काढली जाणार आहे. यावेळी पालखीचे म्हणून शर्मिला महाजन, डॉ. सचिन बोधनी, उल्का खळदकर, भारती फरांदे, अनघा कोचुर, शाम परदेशी , सुप्रीया पांडे, अर्चना वर्टीकर, शामल जम्मा, सुरेखा भालेराव, स्नेहल भिंगारकर, सुभाष जोसी, विजयदत्त निकम, मंजिरी सहस्त्रबुद्धे, नरेंद्र चिपळूणकर, डॉ. समिता टिल्लू आणि सुभाष फाटक, ज्योती कानेटकर, चंद्रशेखऱ जोशी आणि डॉ. माधवी महाजन हे काम पहाणार आहेत.

या संमेलनाचा रसिकांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आजोयकांनी आवाहन केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.