Nigdi : जास्त मोबदल्याच्या हव्यासातून 73 लाखांची फसवणूक

एममपीसी न्यूज – जास्त मोबदल्याचा हव्यास एका महिलेला चांगलाच महागात पडला. गुंतवणुकीच्या बहाण्याने तिघांनी मिळून महिलेची तब्बल 73 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.2) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून शीतल प्रदीप कुंभार (वय 30, रा. अमर साकेत बिल्डींग, स्वारगेट, पुणे) व तिच्या दोन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल कुंभार व फिर्यादी या एकमेकींच्या ओळखीच्या आहेत. ओळखीचा फायदा घेऊन कुंभार हिने फिर्यादी यांना जास्त मोबदल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांना गव्हर्नमेंट स्कीम, शेअर्स, म्युच्युअल फ़ंड, बॉण्ड्स यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीच्या बहाण्याने आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीकडून चेक, ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी तब्बल 73 लाख रुपये घेतले.

त्यानंतर परताव्याबाबत पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले असता यांनी पोलिसांत फिर्याद दिली. उपनिरीक्षक आर.एम.भोये अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.