Chinchwad: लायन्स क्लब ऑफ पूना निगडीतर्फे कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर   

एमपीसी न्यूज –  लायन्स क्लब ऑफ पूना निगडी व प्रेरणा कौशल्य विकास सहाय्यक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या  ‘कौशल्य विकास’ मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चिंचवड येथील चिंतामणी रात्र प्रशालेमध्ये  झालेल्या मार्गदर्शन शिबिराचे उद्‌घाटन लायन हरी नायर, लायन सविता निंबाळकर, माजी प्राचार्य हणमंत चव्हाण यांनी केले. एम. जे एफ. लायन अशोक येवले यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक क्षेत्रातील समविचारी मान्यवरांनी स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि  चांगल्या नोकरीसाठी संधी या उद्देशाने  “प्रेरणा कौशल्य विकास सहाय्यक” संघटनेची स्थापना केली.

चिंतामणी रात्र प्रशालेमध्य मोजमाप पद्धती  प्रवीण पाटील, इंजिनीयरिंग ड्राइंग सुरेश पाचारणे, घरगुती व औद्योगिक इलेक्ट्रिकल वायरिंग हरण पाटील, कॉम्पुटरची माहिती मंदार नाटेकर व अशोक म्हस्के, स्वयंरोजगार प्रेरणा भगिनी ज्योती दाणी, ऑटोमोबाईल इंजिनीयरिंग दीपेश गोफने यांनी मार्गदर्शन केले. शिबीराच्या समारोप कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे उपस्थित होते. प्राचार्य वाघमारे, संयोजक सोनावणे व विद्यार्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 या उपक्रमासाठी लायन संजय निंबाळकर, प्रशांत कुलकर्णी, अजित देशपांडे, रामकृष्ण मंत्री, जयंत मांडे, उषा येवले, मंजिरी कुलकर्णी, चंद्रशेखर पवार, सत्येन भास्कर, प्रेरणा बंधू  फिरोझ मुजावर, नितीन कराबले, ज्ञानेश्वर दाणी, निलेश यादव यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. जुलैनंतर कौशल्य विकास आधारित शिबिरे  नियमित घेण्याची विनंती शाळा प्रशासनाकडून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.