PCMC News: प्रशासन नव्हे आता ‘सामान्य प्रशासन’ विभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. आता प्रशासनऐवजी ‘सामान्य प्रशासन विभाग’ असे संबोधन्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबतचा आदेश काढला.

महापालिकेतील विभागांकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास, पालिकेच्या आकृतीबंधास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. प्रशासन विभागाकरीता सामान्य प्रशासन विभाग असा शब्दोल्लेख करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम, त्यासंबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव, आदेशाचे अधिक्रमण करुन पालिकेतील विविध पदांवर करावयाच्या नियुक्तांचे नियमन, सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी सुधारित नियमांना शासनाने 18 फेब्रुवारी 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजुरी दिलेली आहे.

Chinchwad News: सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांसमोर गणिताची उकल सोप्या पद्धतीने केली स्पष्ट

त्याचा विचार करता महापालिकेच्या ‘प्रशासन’ विभाग ऐवजी ‘सामान्य प्रशासन विभाग’ असो संबोधन्यास, महापालिका सर्व दप्तरी तशी नोंद करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.