Khadki : प्राचार्यांच्या जन्मदिनी माजी विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण बचावचा  संदेश

एमपीसी न्यूज – पर्यावरण बचावचा शुभ संदेश देत खडकी (Khadki) शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या 16 ऑगस्ट दिवशीच्या या जन्मदिना निमित्त व्होकेशनल (व्यावसायिक अभ्यासक्रम) बॅच 1998 ते 2000 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास 50 कुंडया व 50 रोपे भेट स्वरूपात देत एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.

PMPML News : पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी ‘पीएमपीएमएल प्रवासी मित्र’ उपक्रम

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे  , खडकी एज्युकेशन सोसायटीचे सचिव आनंद छाजेड , संचालक रमेश अवस्थी प्राचार्य डॉ. संजय चाकणे , प्रा. टिळेकर प्रा. शुभम पटारे, प्रा. पंडित होले, प्रा. रमेश लोंढे, प्रा. नितिन पहिलवान, प्रा. दिशा वांबूरकर आदी उपस्थित होते.

50 कुंडया व रोपे महाविद्यालयास भेट स्वरूपात देण्यासाठी दिपंकर गायकवाड, सागर चौधरी ,गोकुळ पवार, उदय सोनवणे, किरण कडेकर, सतिष गायकवाड, प्रविण वायदंडे, विराज रोकडे, रुपाली निमकर, योगिनी वाडेकर, निवेदिता भोसले, वृषाली कुंभार व व्होकेशनल बॅच 1998 च्या इतर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.