Khadki : 25 वर्षानंतर पुन्हा भेटले टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील व्होकेशनल बॅचचे माजी विद्यार्थी

एमपीसी न्यूज :  25 वर्षानंतर हरवलेली पाखरे (Khadki) परत एकत्र आली. निमित्त होते, प्रथमच खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील व्होकेशनल (व्यावसायिक अभ्यासक्रम) बॅच 1998 ते 2000 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा. हा मेळावा 30 जुलै रोजी मोठया थाटामाटात संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्याची सुरूवात महाविद्यालयातील उपस्थित गुरूजनांचे औक्षण करत व फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले व या सर्व गुरूजनांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करत सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. सर्व उपस्थित गुरूजनांचा श्रीफळ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या स्नेहमेळाव्यासाठी प्रा. श्रीपाद ढेकणे (ओ. एस. डी. कौशल्य विकास मंत्रालय), प्रा. डॉ. संजय चाकणे, प्रा. पंडित होले ( विभागप्रमुख, व्यावसायिक अभ्यासक्रम), प्रा. शैलेश सोनार ( ऑफिस मॅनेजमेंट), प्रा. दिशा वांबूरकर (मार्केटिंग अँड सेल्समनशिप) प्रा. रमेश लोंढे (ऑफिस मॅनेजमेंट), प्रा. नितीन पहिलवान ( अकौंटिंग अँण्ड ऑडिटिंग), प्रा. प्रवीण मुरकुटे (पायाभूत अभ्यासक्रम), प्रा. बाळासाहेब थोरात (शिक्षक प्रतिनिधी) प्रा. विजय रस्ते (एन. सी. सी. प्रमुख) गणेश जाधव आदी उपस्थित होते.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण देण्याची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याची मागणी 

या मेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी व प्राचार्य यांनी आपले (Khadki) मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन अविनाश सरोदे व ज्योती कड यांनी केले तर मेळाव्याला सर्वाना नाष्टा, चहा, पाणी व भोजन व्यवस्था निवेदिता व हरीश भोसले यांनी केली.

मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. हा स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी दीपंकर गायकवाड, प्रा. विनायक घुले, उदय सोनवणे, रूपेश पतंगे, सागर चौधरी, रुपाली कुतपेल्ली योगिनी वेद, गोकुळ पवार या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


पार्टी करून गाडी चालवणे पडणार महागात.

एमपीसी न्यूज यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.