Khadki : गीता आश्रमामध्ये महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – महाशिवरात्रीच्या (Khadki) निमित्ताने खडकी स्थित गीता आश्रमामध्ये विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात पार पडलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ परमपूज्य गुरुदेव ‘श्री. पद्मनाभन कृष्णदास’ यांच्या पाद्यपूजेने झाला. भाविकांची गुरुजींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. गुरुजींच्या दर्शनाने पुलकित झालेल्या भाविकांनी नंतर प्रसादाचा लाभ घेतला.

महाशिवरात्रीसाठी आश्रमात विविध प्रकारच्या पुष्पमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी आश्रमामध्ये गुरुजींच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने, गुरुजींचे शिष्य व गीता आश्रमाचे प्रमुख विश्वस्त, अमित कस्तुरे यांनी आध्यात्मिक प्रवचन दिले. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक व प्रतिकात्मक महत्व त्यांनी प्रवचनाद्वारे सांगितले. प्रवचनानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. यात भक्तगणांनी महाशिवरात्रीनिमित्त काही विशेष भजने गायली.

Ravet : टास्कच्या बहाण्याने महिलेची 19 लाख रुपयांची फसवणूक

महाशिवरात्रीचे औचित्य साधून ‘गीता आश्रम भजन संघा’द्वारे सुश्राव्य असे ‘शिवषडक्षर स्तोत्र’ गीता आश्रमाच्या यू ट्यूब वाहिनीवर (चॅनल) व अन्य सामाजिक माध्यमांच्या मंचावर (सोशल मीडियावर) प्रसृत करण्यात आले (Khadki) आहे. अशाप्रकारे, अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात गीता आश्रमामध्ये पार पडलेल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता, उपस्थित राहिलेल्या भाविकांना केलेल्या प्रसाद वाटपाने झाली.

परमपूज्य गुरुदेव श्री.’पद्मनाभन कृष्णदास’ यांच्या मार्गदर्शनाखाली निकटवर्तीय भक्तांनी 1998 साली स्थापन केलेल्या ‘नरसेवा नारायणसेवा’ अशी गुरुजींची शिकवण असलेल्या ‘गीता आश्रम’ या धर्मादाय संस्थेमध्ये (चॅरिटेबल) विविध प्रकारचे उपक्रम उदाहरणार्थ, आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्र विषयक मार्गदर्शन, योगवर्ग, ध्यानधारणा, व संस्कृत भाषेचे वर्ग इत्यादी निःशुल्क चालविले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.