Sambhaji Bhide : संभाजी भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण देण्याची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याची मागणी 

एमपीसी न्यूज – संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असून राज्य सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सचिन थोरात यांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे केली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.

PCMC : नोकर भरतीचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार

संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्व घडामोडी लक्षात घेता, संभाजी भिडे गुरुजी यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असून राज्य सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असे सचिन थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी समाजात प्रबोधनाचे काम करीत आहे. आजपर्यंत त्यांनी संदर्भ देऊन भूमिका मांडली आहे, पण मागील काही दिवसापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या विधानांनंतर काही राजकीय व्यक्ती चुकीच्या पद्धतीने विधान करीत आहे. त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि गुरुजींबद्दल अपशब्द वापरणे थांबवावे, अन्यथा आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.