Pune : पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद

एमपीसी न्यूज : जालना येथील घटनेच्या (Pune) निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद पुकारण्यात आला आहे.

औंध, पाषाण, बालेवाडी आणि बाणेर परिसर आज बंद असणार आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त्यांवर सराटी गावात झालेला लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात पुण्यात मराठा क्रांती मोर्चाने एक दिवसीय  लाक्षणिक उपोषण पुकारले आहे.

तसेच पुण्यातील काही भागात सर्व दुकाने बंद असणार आहेत. (Pune) पाषाण, बाणेर, बालेवाडी भागात बंदचे आवाहन करणारे बॅनर्सही लागले आहेत.

Pune : गणेशोत्सव काळात पुण्यात येथे करता येणार पार्किंग, सुमारे 20 शाळा- महाविद्यालयांच्या आवारांचा पार्किंगसाठी होणार वापर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.