Maval : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशालता सातकर यांचे निधन 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मावळ पंचायत समितीचे (Maval) माजी उपसभापती पै चंद्रकांत सातकर यांच्या पत्नी, कान्हे गावच्या शेतकरी कुटुंबातील व सातकर परिवारातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशालता चंद्रकांत सातकर (वय 72) यांचे आज गुरुवार (दि. 14) निधन झाले. सकाळी 7:30 वा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

त्यांचे पश्चात पती, मुलगा,दोन मुली, पुतणे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Pune : पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद

पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती पै चंद्रकांत सातकर यांच्या पत्नी, उद्योजक अजित सातकर यांच्या मातोश्री तर कामगार नेते अशोक सातकर व तळेगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका मंगलताई भेगडे यांच्या चुलती आणि कान्हे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजश्री सातकर यांच्या (Maval) सासूबाई, जळगाव जिल्ह्य़ातील पारोळा नगरपंचायतचे नगराध्यक्ष करण पवार पाटील यांच्या त्या आजी होत.

आज दुपारी 1:00 वा वैकुंठ स्मशानभूमी खापरे ओढा कान्हे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.