Pune : गणेशोत्सव काळात पुण्यात येथे करता येणार पार्किंग, सुमारे 20 शाळा- महाविद्यालयांच्या आवारांचा पार्किंगसाठी होणार वापर

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात शहराच्या मध्यवस्तीत वाहनांच्या (Pune) पार्किंगसाठी शाळा-महाविद्यालयांसह महापालिकेची आणि खासगी वाहनतळ निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक शाखा आणि महापालिकेकडून यंदा गतवर्षीच्या तुलनेत पार्किंगची ठिकाणे वाढविण्यात आली आहेत.सुमारे 20 शाळा-महाविद्यालयांचे आवार सायंकाळनंतर पार्किंगसाठी खुले होणार आहे.

गणेशोत्सवात मध्यवस्तीत नागरिकांना वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळत नाही. गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढते.

त्यामुळे नागरिकांना मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

नागरिकांना पार्किंगसाठी मोठी अडचण येत असे यावर मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांनी शाळा-महाविद्यालयांच्या आवारातील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली होती.

याचा विचार करून वाहतूक पोलीस व संबंधीत शाळा व (Pune) महाविद्यालयांनी जागा उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

गणेशोत्सवाच्या कालावधीत ही पार्किंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. शाळा- महाविद्यालयांच्या आवारात सायंकाळनंतर पार्किंग उपलब्ध होणार आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांनी नि:शुल्क पार्किंगबाबत सहमती दर्शवली आहे. तर, काही वाहनतळांवर ‘पे ॲन्ड पार्क’ असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उत्सवाच्या कालावधीत मध्यवस्तीत कमीत कमी वाहने आणावीत.

विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

Maharashtra : डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.