Pune News : लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेचा समारोप

एमपीसी न्यूज : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेचा (Pune News) समारोप आज शिवनेरी परिसरात संपन्न झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे लाखो धारकरी (कार्यकर्ते) उपस्थित होते. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत धारातीर्थ गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र भिमाशंकर ते किल्ले शिवनेरी वरसुबाई मार्गे असा या मोहिमेचा मार्ग होता.

समारोपावेळी व्यासपीठावर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी, आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्र राजे भोसले, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मुलगा सुशांत खाडे, उद्योजक संजय मालपाणी, आणि मेणबत्तीचे अंध उद्योजक भावेश भाटीया उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सुरू होणाऱ्या बलिदान मासाची घोषणा केली, तसेच शिवजयंती ही तिथीनुसार व्हावी असे मत प्रकट केले.

Alandi News : जया एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

तर, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मी गुरुजींचा धारकरी असल्याने मी बोलणे (Pune News) उचित ठरणार नाही असे प्रतिपादन केले. तर, यावेळी मी शिवप्रतिष्ठानमुळे घडलो असे वक्तव्य अंध उद्योजक भावेश भाटीया यांनी केले. भावेश भाटीया यांनी सांगितले, की जेव्हा मी सुरुवातीला मेणबत्तीचा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी मला भिडे गुरुजी यांनी सांगितले होते, की तू जगाला पाहत नसलास तरी उद्या जग तुला पाहणार आहे. आणि या आशीर्वादामुळेच मी घडलो, असे वक्तव्य केले.

गेले चार दिवस ही मोहिम सुरू होती. समारोपाआधी जुन्नर नगर प्रदीक्षिणा करण्यात आली. तर शिवनेरी-जुन्नर परिसरातील शंकरराव बुट्टे पाटील शाळेच्या पटांगणात मोहिमेचा समारोप करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे धारकरी दरवर्षी गडकोट मोहिमेत पायी प्रवास करतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे कसे जगले असतील? याचा अनुभव घेण्यासाठी ही मोहीम आखली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.