Crime News : दुसऱ्ऱ्या मुलांशी का बोलते म्हणून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज –  दुसऱ्या मुलांशी का बोलतेस असे म्हणते एका व्यक्तीने महिलेला (Crime News) मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर लांडेवाडी भोसरी येथे घडली.

 

विकास साधू गाडेकर (वय 34, रा .आंबेडकर नगर, लांडेवाडी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Bhosari Crime News : पिस्टल सह तरुणाला अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलांशी का बोलतेस, असे म्हणत आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांच्या आई वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत (Crime News) म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.