Bhosari Crime News : पिस्टल सह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) चक्रपाणी वसाहत भोसरी ( Bhosari Crime News ) येथे करण्यात आली.

रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय 31, रा. भोसरी गावठाण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Alandi News : जया एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रुपेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस तसेच एक मोबाईल फोन जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.