Pimpri : मिळालेली भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे गमक – पत्रकार अनिल कातळे

एमपीसी न्यूज – ”परमेश्वराने पृथ्वीतलावर पाठवताना प्रत्येकाची भूमिका ( Pimpri)  ठरवलेली असते. त्याप्रमाणे आपली ज्या भूमिकेसाठी निवड केली, ती भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे गमक असल्याचे” मत पत्रकार, अनिल कातळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

ओतुर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा चिंचवड येथे नुकताच संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याला सुरुवात झाली. ‘आनंदी जीवनाचे रहस्य’ या विषयावर कातळे यांचे मार्गदर्शन झाले. सन 1990 मधील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यामध्ये सहभागी झाले होते. मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जुन्नर येथील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Kalewadi : मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकाची आर्थिक फसवणूक

कातळे पुढे म्हणाले की, ”आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही- ना काही स्वरुपात कमतरता असते. त्या कमतरतेमुळे खचून, डगमगून जाता येत नाही. आपल्याला जीवनाचा खेळ हा खेळावाच लागतो. आयुष्याची खरी किंमत तेंव्हाच कळते जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते. जी माणसे स्वतःच्या संघर्षाच्या काळातील परिस्थितीला आपली ताकद बनवतात ती कधीच दुःखी होत नाहीत. त्यामुळे आयुष्याची वाटचाल करताना येणा-या प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करावा”.

स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थानी ॲड. सलीम पटेल होते. त्यांच्यासह गबाजी गाडेकर, राजेंद्र कुंजीर, लक्ष्मण गटकळ, समाधान तांबे, शर्मिला खर्गे, आरती गटकळ, मंगेश डुंबरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केली. भूतकाळातील आठवणींना उजाळा देत भावुक होत तर, काहींनी विद्यार्थी दशेतील खोडकरपणा जिवंत केला.

शायर सलीम पटेल यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. आयुष्यात आलेले चढ, उतार, कडू, गोड आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. सहभागी विद्यार्थ्यांचा फेटा बांधून तसेच पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. वंदना गावडे, मंगेश डुंबरे, शांता रोकडे, सतीश थोरात, मनीषा कासवा, आरती गटकळ, पांडुरंग शिंदे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहमेळाव्याच्या सुरवातीला हयात नसलेल्या सहका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक बाळासाहेब वाळूंज यांनी केले. तर, सूत्रसंचालन उद्योजक उल्हास पानसरे यांनी केले आणि पत्रकार रोहित खर्गे यांनी आभार ( Pimpri)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.