Kalewadi : मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकाची आर्थिक फसवणूक
एमपीसी न्यूज – मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार ( Kalewadi) करून एका 58 वर्षीय नागरिकाची 94 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक मंगळवार (दि.13) ते बुधवार पर्यंत (दि.14) काळेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी महेंद्र चिंधु धिवरे (वय 58 रा. काळेवाडी ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 8249989484 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
Mahalunge : महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 10 लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना घराचे सामान विकायचे आहे असे सांगून फिर्यादी यांना सामान पाठवण्यासाठी म्हणून फिर्यादी व त्यांच्या मुलाने आरोपीला 94 हजार 500 रुपये पाठवले मात्र चौकशी अंती हे बानवट खाते असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Kalewadi) आहेत.