Chinchwad : प्रतिभा महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वारीमध्ये सहभाग

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा महाविद्यालय व ज्युनीअर कॉलेज मधील विद्यार्थी , प्राध्यापकांनी आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या सोबत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कॉलेजच्या विद्यार्थी व प्राध्यापकानी सहभाग घेऊन वारकऱ्यांना खाऊ वाटप केला.

Talegaon : सोमाटणे टोलनाका प्रकरणी शासनाच्या कार्यवाहीची मागवली सविस्तर माहिती

आकुर्डी ते चिंचवड (Chinchwad) स्टेशन , पिंपरीपर्यत दिंडीसोबत पायी चालण्याचा आनंद घेतला.पहाटे पाच वाजल्यापासून ते साडेसात पर्यंत विद्यार्थी व प्राध्यापक या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय करत असते.

कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉं क्षितिजा गांधी , उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट्स वेलफेअर व सोशल ऍक्टिव्हिटी कमिटी अंतर्गत प्रा.अर्चना गांगड , राष्ट्रीय सेवा योजनाच्या प्रमुख प्रा आश्लेषा देवळे , प्रा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम व्यवस्थित पार पडला. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्रोत्साहन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.