Bhosari : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या (Bhosari) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) महात्मा फुले नगर भोसरी येथे घडली.

विशाल आजिनाथ टेकाळे (वय 28, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील माणिक मगर, माणिक मगर, मनोहर शिंदे, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : सोमाटणे टोलनाका प्रकरणी शासनाच्या कार्यवाहीची मागवली सविस्तर माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आरोपी स्वप्नील याच्याशी डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरच्या लोकांनी फिर्यादी यांच्या बहिणीला शिवीगाळ, मारहाण करून मानसिक (Bhosari) व शारीरिक त्रास दिला. त्यांच्याकडे पैसे आणि वस्तूंच्या स्वरुपात हुंड्याची मागणी केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.