Yerawada : लाच मागणाऱ्या ‘या’ तीन पोलीस हवालदारांचे निलंबन

एमपीसी न्यूज – तक्रार दाखल करून घेण्यासाठी 13 हजार (Yerawada) रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस हवालदरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच तीन पोलीस हवालदारांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत.

अशोभनीय वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणे, तसेच बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेऊन तिघांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.

हवालदार राजेंद्र रामकृष्ण दीक्षित, हवालदार जयराम नारायण सावळकर, हवालदार विनायक मुधोळकर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Bhosari : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी एका टुरिरस्ट व्यावसायिकाकडे 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.12) मध्यरात्री सापळा लावून लाच घेणारे पोलीस हवालदार दीक्षित यांना पकडले होते. लाच घेण्यासाठी हवालदार सावळकर, मुधोळकर यांनी सहाय्य केल्याचे उघडकीस आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.