Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चोरी

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) -मुंबई द्रुतगती मार्गावर एका टेम्पो मधून 40 हजारांच्या कॉपरच्या तारा चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री अकरा वाजताच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ घडली.

Yerawada : लाच मागणाऱ्या ‘या’ तीन पोलीस हवालदारांचे निलंबन

अल्लाउद्दिन गफूर पठाण (वय 43, रा. सोलापूर) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. ते कॉपरच्या तारा घेऊन पुणे (Pune) -मुंबई द्रुतगती मार्गावरून जात होते. उर्से टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो थांबवला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या टेम्पोतून 40 हजारांच्या कॉपरच्या तारा चोरून नेल्या. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.