Talegaon : सोमाटणे टोलनाका प्रकरणी शासनाच्या कार्यवाहीची मागवली सविस्तर माहिती

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी दिवंगत नेते किशोर आवारे यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, त्यांची मागील महिन्यात हत्या झाली. त्यानंतर देखील जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

आवारे यांनी केलेल्या उपोषण आंदोलनावेळी राज्य शासनाकडून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याबाबत आता माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्य शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती मागवली आहे.

Pune : पीएमपीएमएलकडून स्वारगेट व मार्केटयार्डहून 10 बस मार्ग पूर्ववत सुरू

प्रदीप नाईक यांनी राज्य शासनाकडून मागवलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे कि, 11 ते 14 मार्च या कालावधीत सोमाटणे टोलनाक्या संदर्भात केलेल्या उपोषणाची तपशीलवार माहिती द्यावी. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने टोलनाक्या संदर्भात शासनाने घेतलेली भूमिका याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमाटणे टोलनाक्या संदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन त्यावेळी आंदोलकांना देण्यात आले होते. त्या बैठकीचे पुढे काहीच झाले नाही. राज्य शासनाकडून टोलनाक्यासंदर्भात संबंधितांना केलेला पत्रव्यवहार, दिलेले आदेश, मावळ मधील वाहन चालकांचे फास्टटॅग द्वारे पैसे वजा केले होते. ते पैसे परत केले आहेत का, याबाबतही माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मागवलेल्या माहितीचा अर्ज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाच्या सचिवांकडे पाठवला आहे. सचिव स्तरावरून याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

प्रदीप नाईक म्हणाले, “सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन सुरु ठेवणार आहोत. यापूर्वी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्याचप्रमाणे हे आंदोलन करणाऱ्या अन्य लोकांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.