Pune : पीएमपीएमएलकडून स्वारगेट व मार्केटयार्डहून 10 बस मार्ग पूर्ववत सुरू

एमपीसी न्यूज – पुणे (Pune)  महानगर परिवहन महामंडळाकडून कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले 10 बस मार्ग प्रवाशांच्या मागणीनुसार पूर्ववत स्वारगेट/मार्केटयार्ड या ठिकाणाहून उद्या (दि.15) गुरुवार पासून सुरू करण्यात येत आहेत.

Talegaon : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

पूर्ववत सुरू करण्यात आलेले बसमार्ग खालीलप्रमाणे

1) 69 मार्केटयार्ड ते घोटावडेगांव/मुगावडे स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो – 2 बस दर दोन तांसानी

2) 70 मार्केटयार्ड ते मालेगांव (शेडाणी फाटा) स्वारगेट, कोथरूड डेपो, पौडगांव, मालेगांव 2 बस दर दोन तासांनी

3) 227 मार्केटयार्ड ते उरावडेगांव (मारणेवाडी) कोथरूड डेपो, भूगांव, उरावडेगांव – 1 बस दर 4 तासांनी

4) 227 अ मार्केटयार्ड ते खारावडे (लव्हार्डेगांव) पिरंगुट, उरावडेगांव, मुठा – 3 बस

प्रत्येक सव्वा तासांनी

5) 231 स्वारगेट ते काशिंगगांव कमान डेक्कन कॉर्नर, पौडगांव, कोळवणगांव- 1 बस दर चार तासांनी

6) 232 स्वारगेट ते बेलावडे कोथरूड डेपो, पौडगांव, कोंढावळे- 1 बस दर साडेतीन तासांनी

7) 233 मार्केटयार्ड ते पौडगांव शासकीय वसतिगृह स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगांव, घोटावडे फाटा – सात बसेस प्रत्येक अर्धा तासांनी

8) 233 अ मार्केटयार्ड ते कोळवणगांव स्वारगेट, कोथरूड डेपो, दारवली, डोंगरगांव – तीन बस दर क तासांनी

9) 233 ब स्वारगेट ते भादसगांव स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगांव, पौडगांव, रावडेवाडी – एक बस दर चार तासांनी

10) 279 मार्केटयार्ड ते खांबोली (कातरखडक) कोथरूड डेपो, पिरंगुट, रिहेफाटा, खांबोली – एक बस दर साडे चार तासांनी

तरी वर नमूद केलेल्या बस सेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.