Talegaon : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तळेगाव (Talegaon) एमआयडीसी परिसरात करण्यात आली.

Chakan : चाकण पाणीपुरवठा योजनेच्या  १६५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास एमजेपीची तांत्रिक मंजूरी

विशाल चव्हाण (वय 43, रा. तळेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी परिसरातील कातवी येथे एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन विशाल याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव (Talegaon)  एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.