Pavana Dam : पवना धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; नागरिकांनी सतर्क रहावे

एमपीसी न्यूज : पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने आज (मंगळवारी) रात्री दहानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे .(Pavana Dam) 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक राहण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातील येवा वाढला.(Pavana Dam) अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

yavat crime branch : बसमधून 18 तोळे सोने चोरणाऱ्यास यवत गुन्हे शोध पथकाने केल अटक

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.(Pavana Dam) त्यामुळे आज रात्री दहा वाजल्यापासून धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 तर सांडव्यातून 2100 असे 3 हजार 500 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे . पावसाचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.  त्यामुळे पवना नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन उपअभियंता अशोक शेटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.