yavat crime branch : बसमधून 18 तोळे सोने चोरणाऱ्यास यवत गुन्हे शोध पथकाने केल अटक

एमपीसी न्यूज : केडगाव, तालुका दौंड येथील बस मधील लेडीज बॅग मधील 18 तोळे सोने चोरणाऱ्यास यवत गुन्हे शोध पथकाने खेरवा,(yavat crime branch) मध्य प्रदेश येथून अटक करून 9.36 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

31 जुलैला फिर्यादी अनुराधा आनंद चाणक, रा. पुणे मुळ रा. उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली की, केडगाव गावच्या हद्दीत हॉटेल समाधान समोर श्री विश्व ट्रॅव्हल्स बस मध्ये फिर्यादी बसलेले जागेवरून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व कागदपत्रे असे एकूण 11.13 लाख रुपये चा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी अद्यात चोरट्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून सदर हॉटेलचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करून त्यातील एका संस्थेत इसमाविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली.(yavat crime branch) हा संशयित इसम धरमपुरी, तालुका मनावर, जिल्हा धार, मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती यवत गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव यांच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली.

Pune Fergusson college : फर्ग्सुसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार शिकाऊ वाहन परवाना

या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सलग सात दिवस खलघाट, धरमपुरी, मनावर, उमरबन, खेरवा मध्य प्रदेश या भागात संशयित इसमाचा शोध घेतला. तो इसम खेरवा, तालुका मनावर, जिल्हा धार येथे असल्याची माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली.(yavat crime branch) त्यानंतर मनावर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अल्वा व यवत पोलीस ठाण्याचे पथकाने इस्माईल बाबू खान, वय 36 वर्षे, रा. धरमपूर धरम पुरी बायपास, तालुका मनावर, जिल्हा धार, राज्य मध्य प्रदेश या इसमास ताब्यात घेऊन उमरबन पोलीस चौकी येथे आणले. तेथे सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल करून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत 9.36 लाख रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.

आरोपीला मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, (yavat crime branch) अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार, साहेब पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यवत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, दामोदर होळकर, मसिमुद्दीन शेख अकोला, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.