Dighi Jakat naka : पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने दिघी जुना जकात नाका चौकात अवतरली नदी

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थापत्य व जल:निसारण विभागाच्या नियोजना अभावी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने (Dighi Jakat naka) पुणे आळंदी रोडवरील दिघी जुना जकात नाका चौकात पाणी साचून राहिल्याने येथून ये-जा करत असलेल्या नागरिकांना जणू नदी अवतरल्याचाच प्रत्यय आला.

पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थापत्य व जल:निसारण विभागाच्या नियोजना अभावी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पुणे आळंदी रोडवरील दिघी जुना जकात नाका चौक येथे पाणी साचून रविवारी रात्री नदीचे स्वरूप आले होते. यामध्ये 8 ते 10 दुचाकी वाहने बंद पडली व त्यातील 2 ते 3 दुचाकी वाहने वाहून पुढे गेली. याबाबत एमपीसी न्यूज च्या बातमीदाराने सोमवारी पुणे आळंदी रस्त्याच्या दिघी मधील दत्तनगर ते जुना जकात नाका चौक या भागाची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील  पुणे -आळंदी रस्ता हा चऱ्होली ते दिघीतील दत्तनगर पर्यंत 61 मीटर रुंद केला आहे. परंतु दिघी मधील दत्तनगर ते जुना जकात नका चौक पर्यंतचा सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा रस्ता हा फक्त 30 मीटर रुंद करण्यात आला आहे.(Dighi Jakat naka) स्थानिक युवकांनी सांगितले की, दत्तनगर पासून ते जुना जकात नाक्यापर्यंत उतार असल्याने पावसाचे सर्व पाणी जुन्या जकात नाका चौक येथे साचते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने जिथे जुना जकात नका संपतो तिथे उंचवटा तयार केल्याने तेथे पाणी अडून राहते व चौकाला तळ्याचे स्वरूप येते.

Chhatrapati Shivajiraje : शिवाजी महाराजांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

तसेच दिघीच्या दत्त मंदिर डोंगरापासून ते जकात नाका चौक पर्यंत सर्व लोकवस्तीतील रस्त्यावरून वाहणारे पाणी पुणे- आळंदी रोड वर येते व जुना जकात नाका येथे साचते. येथील युवकांनी सांगितले की काही लोकांचे गाई, म्हशींची गोठे या लोकवस्तीत असून त्यातील साचलेले शेन हे पावसात वाहून येते व गटर तुंबतात त्यामुळे देखील पाणी रस्त्यावर येऊन साचते.

काही युवकांनी सांगितले व दाखविले की पुण्याहून येताना जकात नाक्याच्या थोडे पुढे चौका जवळून एक छोटा नाला हा दिघी तून जुन्या बीएसएनएल च्या जागेत वाहत जातो. चार- पाच वर्षांपूर्वी मनपाने पुणे- आळंदी रोड रुंदीकरण करताना फूटपाथ बनवला त्यामुळे चौकातील पाणी अडत होते व ते नाल्यात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे स्थानिक युवकांनी प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचल्यावर थोडा- थोडा फूटपाथ तोडला व पाणी नाल्यात जाण्यासाठी वाट करून दिली. गेल्या 5 वर्षात त्यांनी 8 ते 10 फूट लांबीचा फुटपाथ तोडला आहे.(Dighi jakat naka) त्यामुळे एक ते दोन तासात पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. परंतु रविवारी संध्याकाळी 2 तास ढग फुटी सदृश्य  पाऊस झाल्यामुळे दत्तनगर, परांडेनगर मधून सर्व पावसाचे पाणी जकात नाका चौकात आले व पुणे-आळंदी रस्त्याला नदीचे स्वरूप आले. हे सर्व पाणी जवळील छोट्याशा नाल्यातून निचरा होऊ न शकल्याने पुर्ण रस्त्यावर जोराने पाणी वाहत होते व त्यामधून जाणाऱ्या किमान 8 ते 10 दुचाकी वाहने बंद पडली व त्यातील 2 ते 3 दुचाकी वाहने वाहून गेली.

 

सचिन वाळके म्हणाले की दिघी स्मशानभूमी जवळील बैठ्या घरांमध्ये देखील रविवारी रात्री पावसाचे पाणी शिरले होते.दिघी गावठाण मधील रहिवासी विकास परांडे यांचे बैठे घर असून जमिनीच्या लेवल वर आहे. परांडे म्हणाले की, रविवारी रात्री पावसाचे पाणी रस्त्यावरून येऊन माझ्या घरात शिरले होते.(Dighi jakat naka) दुकानदार सतिष नेटके म्हणाले की माझे दुकान जमिनीपासून 2 ते 3 फूट उंचावर असल्याने पुणे आळंदी रोडवर वाहत असणारे पाणी आत आले नाही. पण बाहेर ठेवलेल्या गाड्या, उश्या व इतर साहित्य अचानक आलेल्या पावसामुळे भिजले. याबाबत प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणाले की, ” मी उद्या स्थापित विभागाचे अधिकारी यांना उद्या सकाळी दिघी जुना जकात नका चौकाची पाहणी करण्यासाठी पाठवतो. ते  तेथील जागेची पाहणी करतील, स्थानिक लोकांशी संवाद साधतील व नंतर योग्य त्या उपाययोजना करून पाणी साचण्याची समस्या सोडवतील.” असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.