Chhatrapati Shivajiraje : शिवाजी महाराजांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivajiraje) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होती. त्याचवेळी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे शिवाजीराजे हे काका होते. गेल्या अनेक दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

Pune news : पुणे – विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन विशेष ट्रेनच्या कालावधीला मुदतवाढ

उद्या सकाळी 9 वाजता सातारामधील त्यांच्या अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसेच त्यानंतर दुपारी 2 वाजता अदालत वाडयापासून अंत्ययात्रा निघणार असून संगम माहूली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारअसल्याचे उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पेजवरून सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.