Pune news : पुणे – विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन विशेष ट्रेनच्या कालावधीला मुदतवाढ

एमपीसी न्यूज : पुणे आणि विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा (Pune news) कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन घेतला आहे.

01921 विशेष ऑक्टोबर 6 ते नोव्हेंबर 10 (6 फेऱ्या) दर गुरुवारी चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 01922 विशेष दि. 05.10.2022 ते 09.11.2022 (6 फेऱ्या) दर बुधवारी चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या विशेष ट्रेनची संरचना, वेळ आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

Khadakwasla dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6848 क्यूसेक्स विसर्ग सुरू

आरक्षण: विशेष ट्रेन क्र.01921च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 14.09.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.(Pune news) या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी  www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी  किंवा NTES ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.