Daily water supply demanded : शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करा; शिवसेना महिला आघाडीची प्रशासनाकडे मागणी

एमपीसी न्यूज : संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दररोज पाणीपुरवठा करावा. (Daily water supply demanded)थांबलेला महापौर निधी( वैद्यकीय  सेवेसाठी) प्रशासक म्हणून पुन्हा चालू करावा अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

माजी नगरसेविका मीनल यादव म्हणाल्या, “शहरवासीयांना 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.अडीच ते पावणे तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.(Daily water supply demanded) पिंपरी- चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पण, नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. आता दसरा, दिवाळी जवळ आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने तत्काळ दररोज पाणीपुरवठा सुरू करावा”.

Rojgar Melawa : रोजगार भरती मेळाव्यात 803 उमेदवारांची निवड

यावेळी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (Daily water supply demanded) जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव, उपजिल्हा संघटिका  वैशाली मराठे, उपशहरसंघटिका वैशाली कुलथे, रजनी वाघ, विभागसंघटिका बेबी सय्यद,  कोमल जाधव, शिल्पा अनपन, अश्विनी खंडेराव, प्रांजल पाडेकर,  स्मिता पाटील,  शोभा मोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.