Vedanta Project : तळेगाव येथील वेदांत प्रकल्प गुजरातला वळवला; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील हजारो लोकांना रोजगार मिळवून देणारा तळेगाव दाभाडे येथील वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर हा प्रोजेक्ट गुजरातला (Vedanta Project) वळवण्यात येणार असल्याची माहिती वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दु:ख व्यक्त करत शिंदेसरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले आहे, कि ”वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. पण हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही? याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.”

Vedanta Project : पुण्यातील वेदांत प्रकल्प गुजरातला वळवला; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

पुढे ते म्हणाले, कि खोके सरकार राजकारणात (Vedanta Project) व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल.

वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल म्हणाले, कि मला जाहीर करताना आनंद होत आहे, कि नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट हा गुजरातमध्ये स्थापित केला जाईल. वेदांताची ₹1.54 लाख कोटींची महत्त्वपूर्ण गुंतवणूक भारताच्या आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅलीला प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत म्हंटले आहे, कि भारतात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्याची तुमची दृष्टी आणि दृढनिश्चयाबद्दल तसेच गुजरात सरकारच्या पूर्ण सहकार्याने आम्ही या प्रकल्पाची जलद अंमलबजावणी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.