Pune Fergusson college : फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार शिकाऊ वाहन परवाना

एमपीसी न्यूज : शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी विद्यार्थ्यांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही. (Pune fergusson college) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रादेशिक परिवहन महामंडळ केंद्राचे (आरटीओ) उद्घाटन राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते बुधवारी 14 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. फर्ग्सुसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या केंद्राद्वारे शिकाऊ वाहन परवाना उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारे फर्ग्युसन हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे.

वाहन परवाना काढण्यासाठी सध्या प्रत्येकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते. शिकाऊ वाहन परवाना काढल्यावर कायमस्वरुपी परवाना मिळण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागते. मात्र आता पुण्यातील फर्ग्सुसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकाऊ वाहन परवाना महाविद्यालयातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील  विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही.(Pune fergusson college) फर्ग्युसन महाविद्यालयात प्रादेशिक परिवहन महामंडळ केंद्राचे (आरटीओ) उद्घाटन राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते बुधवारी 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

Vedanta Project : पुण्यातील वेदांत प्रकल्प गुजरातला वळवला; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

आधार कार्ड आणि अन्य कागदपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शिकाऊ वाहन परवाना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा बहुमोल शैक्षणिक वेळ, तसेच प्रवास खर्च आणि श्रमाची बचत होऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.(Pune fergusson college) अशा प्रकारची सुविधा देणारे फर्ग्युसन हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.