PCMC : अखेर 353 जागांचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या विविध (PCMC) विभागांतील ब आणि क गटातील चार पदांचा निकाल बुधवारी (दि.30) रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

NCP : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत लढणार मग चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील 388 जागांसाठी राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून दि. 26, 27 व 28 मे परीक्षा झाली. 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

पालिकेने 11 पदांच्या 35 जागांसाठी (दि.7) ऑगस्ट निकाल जाहीर केला होता. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल रखडला होता. त्यामुळे ऑनलाइन परिक्षा होऊनही निकाल लावण्यास विलंब का होत आहे, असा सवाल परीक्षार्थीं उपस्थित करत होते.

11 पदांच्या 35 जागांसाठी 7 ऑगस्टला निकाल जाहीर झाल्यानंतर चार पदांच्या निकाल स्वातंत्र्य दिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकल्याने परीक्षार्थींकडून महापालिका आणि परिक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीवर मोठी नाराजी व्यक्त केली जात (PCMC) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.