NCP : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत लढणार मग चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

एमपीसी न्यूज –  राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह आणि नाव आपल्याकडे असून आगामी ( NCP)  लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप-शिंदे गटासोबत महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या चिंचवड, भोसरीवरील दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. सलग 15 वर्षे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. 2009 मध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन मतदारसंघाची निर्मिती झाली. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत पिंपरी, भोसरी राष्ट्रवादी तर चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सुटला.

पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि चिंचवड, भोसरीतून अपक्ष लढलेले लक्ष्मण जगताप, विलास लांडे निवडून आले होते. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली. अजितदादांचे कट्टर समर्थक अशी ओळख ( NCP)  असलेले जगताप भाजपकडून आमदार झाले. महेश लांडगे भोसरीतून अपक्ष निवडून आले. तर, पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विजयी झाले होते.

Pune : पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे

2019 मध्ये राष्ट्रवादीला चिंचवड, भोसरीत अधिकृत उमेदवार देता आला नाही. दोन्ही मतदारसंघातून भाजपचे जगताप, लांडगे ( NCP)  निवडून आले. तर, पिंपरीतून घड्याळावर बनसोडे विजयी झाले. 2023 मध्ये गंभीर आजाराने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला 94 हजार मते मिळाली होती. मतदारसंघाच्या निर्मितीपासून चिंचवडमध्ये पहिल्यांदाच घड्याळावर एवढी मते पडली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत चिंचवडचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असा दावा शहर राष्ट्रवादीकडून केला जावू लागला.

2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. अजित पवार हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे.  पिंपरीत अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

दोघेही अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यामुळे पिंपरी, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहू शकेल. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, भोसरीत भाजपचेच महेश लांडगे आमदार आहेत. त्यामुळे हे दोन मतदारसंघ भाजपला सोडावे लागणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता ( NCP)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.