Pune : पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोहगाव परिसरात ( Pune) असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : “खोटी सॅलरी सांगून लग्न केले..”, पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरोधात गुन्हा दाखल

प्रकरणी अधिक माहिती अशी की, लोहगाव येथे केंद्रीय विद्यालय आहे. आरोपी शिक्षक हा या शाळेत शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आहेत. फिर्यादी यांची दहा वर्षाची मुलगी शाळेत असताना दोन आठवड्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने मैदानावर वाईट उद्देशाने तिच्या अंगाला स्पर्श केला. तर आणखी एका विद्यार्थिनीशी असेच वर्तन करत तुला पीटी क्लास कसा वाटला असे विचारून अश्लील कृत्ये केले.

दरम्यान या मुलींनी घरी गेल्यानंतर आईला संपूर्ण हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला असून ( Pune) अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.