Maval LokSabha Elections 2024 : महायुतीचा रहाटणीत युवा मेळावा

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे (Maval LokSabha Elections 2024) आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा युवा पदाधिकारी मेळावा  आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता  होणार आहे.

Pimpri : कारची सुरक्षा भिंतीला धडक, अपघातानंतर गाडी जळून खाक

महायुती युवा पदाधिकारी मेळावा  शनिवार  20 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता विमल गार्डन बँकवेट हॉल, रहाटणी, काळेवाडी येथे होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिवसेना युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे यांनी (Maval LokSabha Elections 2024) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.