Pune : गणेशोत्सवासाठी राज्यभरातून यंदा सुटणार साडे तीन हजार बस, त्यातील 2 हजार 350 गाड्या फुल्ल

एमपीसी न्यूज – गणपती व शिमगा या सणाला कोकणी बांधव आवर्जून त्यांच्या गावाला  जातात. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गर्दीचा विचार ( Pune ) करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा सुमारे 3 हजार 500 एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.

यातील सुमारे 2 हजार 350  गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तसेच स्वारगेट बस स्थानकावरून सुमारे दीडशे बस सोडण्यात येणार आहेत. महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत असल्याने यंदाच्या वर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

PCMC : अखेर 353 जागांचा निकाल जाहीर

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात भक्त कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. ही संख्या मोठी असल्याने प्रवासी रेल्वे, एसटीसह खासगी गाड्यांचा आधार( Pune ) घेतात. एसटी प्रशासनाने देखील याचे नियोजन केले असून विविध आगारातून गाड्या मुंबईसाठी सोडल्या जाणार आहेत.

एसटी मुंबईत पोचल्यावर कोकणातील विविध गावांसाठी एसटी धावतील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीपासूनच सीटचे आरक्षण केले आहे. यात ऑनलाइन आरक्षण ते समूह आरक्षणाचा समावेश आहे.

त्यामुळे ऑगस्टमध्येच साडेतीन हजार पैकी 2 हजार 350  बसचे आरक्षण झाले आहे. उर्वरित गाड्यांचे काही दिवसांत आरक्षण होण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.

हे लक्षात घेऊन पुणे विभागाने सुमारे 150 एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या आधी दोन दिवस पुण्यातून रत्नागिरी, कणकवली, चिपळूण आदी मार्गांवर ( Pune ) गाड्या सोडल्या जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.