Pune Traffic Police : सावधान…वाहतूक दंड वसूलीचा बनावट संदेश व्हायरल, वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे ( Pune Traffic Police) आवाहन केले आहे. कारण सध्या नागरिकांना एक संदेश पाठवला जात आहे, ज्यामध्ये वाहतूक नियमभंगाचा दंड व बनावट लिंक पाठवली जात आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट संदेशाना बळी न पडता आपली फसवणूक टाळावी असे आवाहन पुणे वाहतूक पोलीस व सायबर पोलिसांनी केले आहे.


कोणती लिंक अधिकृत व कोणती फेक 

यासंदर्भात पुणे वाहतूक पोलिसांनी एक पत्रक जाहीर केले असून त्यात म्हटले आहे की, नागरिकांमध्ये https://echallanparivahan.in/ हि अनधिकृत लिंक व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते. कारण वाहतूक पोलिसांची अधिकृत लिंक हि  https://echallan.parivahan.gov.in/ असून त्याद्वारेच ऑनलाईन पद्धतीने दंड स्विकारण्यात येतो.

 

Pune : गणेशोत्सवासाठी राज्यभरातून यंदा सुटणार साडे तीन हजार बस, त्यातील 2 हजार 350 गाड्या फुल्ल


हेल्प डेस्क ची निर्मिती 

नागरिकांमध्ये ही फसवणूक होऊ नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी 28 ऑगस्ट म्हणजे सोमवार पासून ( Pune Traffic Police) हेल्पडेस्कची निर्मिती केली आहे. हा हेल्प डेस्क येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त कार्यालयात कार्यरत असणार आहे. या हेल्पडेस्क द्वारे नागरिकांना वाहतूक नियम, दंड व त्याचा भरणा याबाबात पूर्णपणे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये वाहतूक भंग केल्याचे स्विकारल्यास अगदी दंडात देखील तडजोड  केली जाणार आहे.

सायबर चोरट्यांनी थकीत दंडाचा बनावट संदेश प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती सायबर गुन्हे शाखेला कळविण्यात आली आहे. नागरिकांनी बनावट संदेशाला प्रतिसाद देऊ नये. असे प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) विजयकुमार मगर यांनी केले ( Pune Traffic Police) आहे.

 

+

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.