Chikhali : पूर्णानगर येथील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती

एमपीसी न्यूज – चिखली पूर्णानगर येथील ( Chikhali ) हार्डवेअर ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिकच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीची  घटना कशी घडली? याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने चौकशी समितीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.

सावधान…वाहतूक दंड वसूलीचा बनावट संदेश व्हायरल, वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

चिमणाराव चौधरी यांचे पूर्णानगर येथील टेल्को रोडला भाड्याच्या गाळ्यात सचिन हार्डवेअर ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिकचे दुकान होते. चौधरी कुटुंबीय दुकानाच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे दुकानात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. रंगाचे डबे, थिनर असल्याने तातडीने पेट घेतला. आग भडकली. हवा येणे बंद झाले. त्यामुळे गुदमरल्याने आणि होरपळून चौघांचा मृत्यू झाला.

अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीमध्ये पोलीस, अग्निशमन विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल सादर करेल. त्याचबरोबर शहर परिसरात आणखी दुकानाच्या वरच्या माळ्यावर कोण वास्तव्य करत आहे का, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी ( Chikhali ) घेण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.