Pune : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात पडली; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन साजरे करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या (  Pune ) कारचा टायर फुटला. त्यामुळे कार खडकवासला धरणात पडली. यामध्ये चारजण कारमधून बाहेर पडले. तर 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 30) सायंकाळी कुरण बुद्रुक येथे घडली.
संस्कृती उर्फ तनू प्रदिप पवार (वय 11, रा. नांदेड सिटी, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

 

Chikhali : पूर्णानगर येथील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पवार हे त्यांची पत्नी अर्चना पवार, मुलगा प्रद्युम्न पवार, मुलगी संस्कृती पवार आणि बहिणी सुनीता शिंदे पवार असे पाचजण त्यांच्या मूळ गावी पानशेत येथे जात होते. खडकवासला धरणाच्या बाजूने जात असताना कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत प्रदीप यांच्या कारचा (एमएच 12/पीझेड 0120) टायर फुटला. यामुळे प्रदीप यांचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार खडकवासला धरणाच्या बॅकवाटरमध्ये 15-20 फूट खोल पडली.
तीन बाजूच्या काचा उघड्या असल्याने त्यातून प्रदीप, त्यांची पत्नी, मुलगा आणि बहीण पाण्यातून बाहेर पडले. मात्र संस्कृती बसलेल्या बाजूची काच बंद असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच कुरणगावचे पोलीस पाटील आणि स्थानिक मच्छीमार घटनास्थळी पोहोचले. पीएमआरडीए, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला पाचारण करण्यात आले. त्यांनी संस्कृतीचा मृतदेह बाहेर काढला. अन्य चौघांवर पुण्यातील एका खासगी (  Pune ) रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.